अकोले भाजपने साधला लाभार्थ्यांशी संवाद

0
अकोले (प्रतिनिधी) – विद्यमान महाराष्ट्र सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 31 ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार्‍या ‘होय, हे माझं सरकार’ या भारतीय जनता पार्टी च्या अभियानांतर्गत कळस बुद्रुक (ता. अकोले) येथील सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी अकोले भाजपने सवांद साधला.
भाजप चे अकोले तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, भाजयुमो चे तालुका अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, शाखा अध्यक्ष कारभारी वाकचौरे, दौलत वाकचौरे, भास्कर कानवडे, गणेश वाकचौरे, दिलीप वाकचौरे यांनी हा सवांद साधला.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून विमल वाकचौरे, विमल भोर, सिंधुबाई पाडेकर, हौसाबाई वाकचौरे, कौसल्याबाई वाकचौरे यांना महिन्याला मदत सुरू झाली. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. तर सीताबाई रामनाथ सावंत यांना व त्याची जाऊ सखुबाई पुंजा सावंत यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेमुळे घराचे स्वप्न साकार झाले. आम्ही आमची काही पुंजी त्यात घालून एक चांगला भक्कम घरकुल उभं केलं असे मत त्यांनी व्यक्त केलं.
रामदास वाकचौरे यांनी मी अपंग असल्याने संजय गांधी निराधार योजनांची मदत मिळत असून या सरकारने प्राधान्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेतून माझे स्वप्नातील घर साकार होत आहे. एक हप्ता बाकी असून तो लवकर मिळावा असेही मत व्यक्त केलं. कौसाबाई वाकचौरे यांनी रोजगार हमी योजनेतून शौचालय बांधले. योजना चांगली असल्याने समाधान व्यक्त करीत संजय गांधी निराधार योजनेची मदत मिळते. यातून माझं औषधपाण्याचा खर्च भागतो, असे सांगितले.
भाजप सरकारने गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविल्या व अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होत असून त्याचा योग्य विनियोग होत आहे. संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून अनेक गरिबांना मदत झाली आहे. तर शेतकरी सल्ला समिती आत्माच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सबसिडी लगेच दिली जाते. पूर्वी काँगेसच्या काळात या सबसिडीसाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत होती. आता मंजूर प्रकरणाची सबसिडी दिली जाते त्यामुळे शेतकरी वर्गही समाधानी आहे, असे मत संजय गांधी निराधार योजनेचे ढअध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*