Friday, May 3, 2024
Homeनगरभंडारदरा परिसरात पर्यटकांची गाडी बुडाली, दोघांचा मृत्यू

भंडारदरा परिसरात पर्यटकांची गाडी बुडाली, दोघांचा मृत्यू

अकोले l प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोल्हार- घोटी रस्त्यावर वारुघुशी फाट्याजवळील ओढ्यात पर्यटकांची गाडी वाहून गेली.

- Advertisement -

यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. मृत दोघे हे औरंगाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान अकोले तालुक्यात पाणलोटक्षेत्रात पाउस सुरु असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने पर्यटकांची वर्दळ या भागात सुरु झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या