टोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा – अकबरुद्दीन ओवेसी

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी ‘मै भी चौकीदार’ ही मोहिम सुरू केली आहे. भाजपच्या प्रत्येक नेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरील अकाऊंटवरील नावपुढे ‘मै भी चौकीदार’ असा उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर एआयएमआयमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

एआयएमआयम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेमध्ये म्हटले आहे की, मोदी कधी चहावाला बनतात तर कधी चौकीदार बनतात.चहावाला बनून त्यांनी देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार बनून पुन्हा ते तेच काम करत आहेत.

मोदी जेव्हा चहावाला झाले. त्यावेळी मी म्हटले होते की, चहाची किटली, चुल मी देईन, चहा त्यांनी बनवून आम्हाला द्यावा. मोदी असे व्यक्ती आहेत, जे कधी नाल्यातील गॅसवर पकोडे बनवतात. आता टोपी आणि शिट्टी गळ्यात अडकून मोदींनी देशाची चौकिदारी केली तरी खबूप चांगले होईल, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*