Type to search

Featured सार्वमत

नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार – अजित पवार

Share
पुणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचे अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी रविवारी पुण्यात बोलताना नगरच्या जागेविषयीच्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि ती राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा खुलासा आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा पवार यांनी रविवारी घेतला. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
अहमदनगरच्या जागेवरून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलेच शीतयुद्ध रंगले आहे. नगरच्या जागेवर कोणी लढायचे याचा निर्णय झाला आहे. ती जागा राष्ट्रवादीच लढणार असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. तर नगरच्या जागेवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील लढण्यास उत्सुक आहेत. अशा अवस्थेत शरद पवार यांच्या हातात निर्णय केंद्रित झाल्याने ही जागा आपल्या मुलासाठी सोडली जावी म्हणून पवारांना भावनिक आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे. दरम्यान, नगरची जागा काँग्रेसला सोडणार का असे शरद पवार यांना अकलूज येथे पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी होय असे उत्तर दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे विखे पाटलांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांच्या वक्तव्यावर तासाभरातच शरद पवार असे म्हणाले नाही, काँग्रेससाठी नगरची जागा सोडली नाही असा खुलासा केला. रविवारी पुन्हा अजित पवार यांनी आम्हे नगरची जागा लढण्यास ठाम आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मनसेला समावून घेण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसने त्यासाठी ताठर भुमिका घेऊ नये असे सांगितले.

आचारसंहिता 8 मार्चला लागण्याची शक्यता
अहमदबाद येथे 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार असून त्यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे 8 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!