नाशिकच्या अजिंक्य, शययूची आशियाई स्पर्धेसाठी निवड

0

नाशिक । आजपासून हाँगकाँग येथे सुरू होणार्‍या वरिष्ठ गटाच्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारतीय पुरूष संघात नाशिकच्या अजिंक्य दुधारे तर महिला संघात शरयू पाटील यांची निवड झाली आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच भारतीय क्रीडा प्राधिकारणाच्या नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट सेंटर पतियाळा येथे पार पडले.

अजिंक्य दुधारेने तलवारबाजीच्या इपी प्रकारात तर शरयूने फॉईल प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावले आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून मोहित अश्विनी, दिपकसिंग पटीयाल, विजयकुमार, पवनकुमार शर्मा काम पाहणार आहे.

भारतीय संघ :

फॉईल प्रकार :

मुली – शरयू पाटील, बिंदू देवी, राधिका आवटी.
मुले – विकी थॉकचॉम, निवोदकुमार, राकेश राय, राजशोर सिंग.

इपी प्रकार :
मुली – कविता देवी, जयप्रित कौर, ज्योतिका दत्ता, पवनदिप कौर.
मुले – अजिंक्य दुधारे, सुनील कुमार, जयंतासिंग, शिवा मंगेश.
सॅबर प्रकार :
मुली – ज्योत्सना जोश, भवानीदेवी, रिशा पी, दयानादेवी.
मुले – जिशो निधी, सुरिंदर सिंग, करन सिंग, मिथून पी.

LEAVE A REPLY

*