Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Share
नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याची माहिती माकन यांनी दिली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत माकन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.

अजय माकन यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राजीनाम्यासंबंधी पत्र पाठवले आहे. प्रकृती ठीक नसल्याने उपचार करण्यासाठी विदेशात जात आहे. त्यामुळे दिल्ली काँग्रेस अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची प्रकृती ठीक नाही. त्यातच अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिल्याने लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने अजय माकन यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. माकन यांनी राजीनामा दिला नसून ते उपचार करण्यासाठी विदेशात गेले आहेत. ते उपचार घेऊन लवकरच भारतात परततील आणि आपले पद सांभाळतील, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!