अहमदनगर : ‘घुमा’च्या विशेष गाण्याला अजयचा ‘आवाज’

0

दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे यांच्या ‘घुमा’ या चित्रपटासाठी ‘वणवा पेटला’ हे विशेष गाणे तयार करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्या आवाजाने लवकरच ‘वणवा पेटला’ हे गाणे ऐकायला मिळणार आहे.

या वणव्याचा उद्यापासून भडका उडणार आहे.

दिग्दर्शक महेश काळे हा नागराज मंजुळे आणि भाऊराव खऱ्हाडे यांच्याच अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेल्या ‘घुमा’ला सर्वच फिल्म फेस्टिव्हल्समध्ये पुरस्कार मिळाल्याने गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायले आहे.

२९ सप्टेंबर पासून घुमा हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

*