फोटो गॅलरी : विमान उड्डाणासाठी काकडी विमानतळ सज्ज

0

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)- साईबाबांच्या सेवेसाठी काकडी येथे होत असलेल्या विमानतळाचे काम अंतीम टप्प्यात आहे. टर्मिनल इमारतीचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर असून धावपट्टीसह इतर सर्वच कामे पुर्ण झाली आहे. विमान उड्डानासाठी विमानतळ विकास प्राधीकरणाने सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. त्यामुळे लवकरच विमानाचे उड्डाण होईल अशी अपेक्षा साईभक्तांना आहे.

धावपट्टी, संरक्षण भिंत आदी कामे पुर्ण झाली आहे. शेतकर्‍यांचे व प्राधिकरणाचे काही प्रश्‍न बाकी आहे. काकडी गावातील काही पायाभुत सुविधांपैकी ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत रस्ते, गावातील विद्यालयाच्या शाळा खोल्याच्या निधी प्राधिकरणाने दिल्याने त्याचेही भुमिपुजन झाले आहे. विमान उड्डाणाची संपुर्ण तयारी प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे लवकरच येथून विमान उड्डाण होईल.

मात्र प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा प्रश्‍न अजुनही प्रलंबीत आहे. काही शेतकर्‍यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. विमानतळाच्या उद्घाटनाच्या नामदार, खासदार यांनी यापुर्वी प्राधिकरणाच्या वतीने विविध तारखा अधिकार्‍यांनी जाहीर केल्या. मात्र त्या तारखा हवेतच विरल्या आहेत.

आता विमान उड्डानासाठी लागणार्‍या विविध मंजुर्‍या प्राधिकरणाने मिळविल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळेस प्राधिकरण विमान उड्डानाची घोषणा करु शकते. साईबाबांचा शताब्दी महोत्सव जवळ आला असल्याने त्या अगोदर विमानाचे उड्डाण होईल अशी माहीती विमान प्राधिकरणाने दिली आहे. काकडीतून विमान सुरु झाल्यानंतर साई भक्तांची मोठी सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

*