एअर इंडियाचे विमान संरक्षक भिंतीला जाऊन धडकले; १३६ प्रवासी सुखरूप

0
मुंबई : एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिल्याची मोठी दुर्घटना त्रिची विमानतळावर घडली. या घटनेत कुठलाही अनर्थ घडला नसून १३६ प्रवासी सुखरूप आहेत.

मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान त्रिचीहून दुबईला निघाले होते. दरम्यान विमानाचे मुंबई इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

त्रिची विमानतळावरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर एटीसीच्या संरक्षक भिंतीला हे विमान जाऊन धडकले. त्यानंतर वैमानिकाने पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.

दरम्यान, इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानाची पाहणी केली. अपघात किरकोळ तांत्रिक कारणाने झाल्याचे समोर येत असून विमान पुढील उड्डाणासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*