Type to search

Breaking News देश विदेश

मार्चपर्यंत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन विक्रीस काढणार

Share

मुंबई : डबघाईला आलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सरकारद्वारा विक्रीला काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान देशाची आर्थिक स्थिती चांगली नसून सरकारवर सध्या ५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीमधून सुमारे एक लाख रुपयांचा फायदा होईल, तसेच या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यानंतर पुढील वर्षात या कंपन्यांची विक्री होईल, अशी आशा सितारामन यांनी व्यक्त केली आहे.

या महिन्याच्या सुरूवातीस एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात कि, एअर इंडियाला रुळावर आणावयाचे असल्यास त्याचे विभाजन करावे लागेल. परंतु एअर इंडियासाठी गुंतवणूकदार यासाठी तयार होणार नाहीत, त्यामुळे विक्री हा पर्याय असू शकतो. असं या पत्रात म्हंटले आहे.

भारत पेट्रोलियमचे बाजार भांडवल अंदाजे ०१.०२ लाख कोटी रुपये आहे. ५३. ५३ टक्के भागभांडवल विकल्यामुळे सरकारला प्रवेशाच्या प्रीमियमसह सुमारे ६५ हजार कोटी रुपये फायद्याची अपेक्षा आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!