Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

एअरफोर्सच्या ताफ्यात येणार फायटर व ट्रेनर विमाने

Share

नवी दिल्ली – सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीची जवळपास 300 फायटर आणि बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्यासाठी इंडियन एअर फोर्सकडून सरकारला सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हा संपूर्ण व्यवहार अब्जावधी डॉलर्सचा आहे.

तेजस मार्क-2 चे दहा स्क्वॉड्रन, 36 अ‍ॅडव्हान्स मिडियम फायटर विमाने तसेच नवीन बनवण्यात आलेली एचटीटीपी-40 ही ट्रेनर विमाने एचएएलकडून खरेदी करणार असल्याचे आयएएफने सरकारला सांगितले आहे. एअर फोर्स प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी जाहीर केलेली एअरफोर्सची ही भूमिका महत्वपूर्ण आहे.

आयएएफ आणि एचएएलमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहे असे संरक्षण मंत्रालयातील अधिकार्‍याने सांगितले. एचएएलने आतापर्यंत 12 विमाने आयएएफला सुपूर्द केली आहेत. वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले उत्पादनाचे निर्धारीत लक्ष्य एचएएलला गाठता आलेली नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!