Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एयर कमोडोर पी.एस. सरीन ओझर एअर फोर्स स्टेशनचे नवे प्रमुख

Share
एयर कमोडोर पी.एस. सरीन ओझर एअर फोर्स स्टेशनचे नवे प्रमुख, Air Commodore p s sarin new ojhar air force station in charge

नाशिक | प्रतिनिधी 

ओझर येथील वायू कमान अधिकारीपदाचा एअर कमोडर पी एस सरीन यांनी आज पदभार स्वीकारला. सरीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हवाई दलाच्या परेडलाही त्यांनी संबोधित केले. हा सोहळा हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

ग्रुप कॅप्टन व्हीआरएस राजू यांच्याकडून सरीन यांनी पदभार स्वीकारला. या समारंभासाठी ओझर येथील हवाई दलाच्या वतीने पदग्रहण समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवाई दलाच्या वतीने रस्‍मी परेडचे आयोजन करण्‍यात आले होते.

परेड झाल्‍यानंतर , एयर कमोडोर पी एस सरीन विशिष्‍ट सेवा मेडल यांनी वायुसेना स्‍टेशन ओझरचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, या पुढील काळातही स्‍टेशनची चांगल्या प्रकारे देखभाल, तसेच येथील पायाभूत सुविधा व वरिष्ठ पातळीवरील देखभालीच्या अनुशंघाने येथील गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

एयर कमोडोर पी एस सरीन वीएसएम यांनी आयआयटी कानपूर येथून एरोनॉटिकल इंजिनियरींगमध्‍ये एम टेक आणि पूणे विद्यापीठातून एम बी ए ची पदवी घेतली आहे.

दिनांक 05 सप्‍टेबंर 1988 रोजी त्‍यांनी एरोनॉटिकल इंजिनियरींग शाखा मध्‍ये भारतीय वायुसेना मध्‍ये प्रवेश केला. आपल्‍या सेवाकाळात त्‍यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांनी घेतले आहेत.

यामध्ये अन्वस्र रणनीति जे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीजी एरोस्‍पेस इंजिनियरिंग साठी होत असतो. अशा हवाई दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान हवाई दल प्रमुखांच्या द्वारे त्यांना सन्मानित करण्यात येते.

यामध्ये 08 ऑक्‍टोबर 1997 रोजी सरीन यांची प्रशंसा करण्यात आली होती. तसेच विशिष्‍ट सेवा मेडल ने ही 26 जनवरी 2013 रोजी त्यांना गौरविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!