एअर एशियाच्या कर्मचाऱ्याने केला प्रवासी महिलेचा विनयभंग!

0

एअर एशियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पण त्या महिलेविरोधात एअर एशियाकडूनच तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्या प्रवासी महिलेने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, एअर एशियाच्या विमानातून प्रवास करत असताना, तिने विमानातील शौचालय स्वच्छ नसल्याची तक्रार केल्यानंतर विमानामध्येच एका कर्मचाऱ्याने तिचा विनयभंग केला आणि अश्लील भाषेत संभाषण केल्याचा आरोप तिने केला आहे. रांचीवरून हैदराबाद मार्गे बंगळुरूला जाणाऱ्या विमानात ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली.

त्या प्रवासी महिलेने केलेले हे सर्व एअर एशियाने आरोप फेटाळले आहेत. तसेच या पूर्वीही या प्रवासी महिलेविरोधात नाहक त्रास दिल्या प्रकरणी एअर एशियाने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात एअर एशियाने त्या प्रवासी महिलेचा नाहक त्रास देणारी महिला असा उल्लेख करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*