एड्स : श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, नगर, शेवगाव रेड झोनमध्ये

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- एड्स विरोधातील लढ्यात प्रचार, प्रसार, प्रबोधन, समुपदेशन यामुळे नगर शहर आणि जिल्ह्यात एचआयव्ही बाधीतांची टक्केवारी कमी होत आहे. 2002 पासून आतापर्यंत नगर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 18 हजार 599 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. हा आकडा शासकीय यंत्रणेचा आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, नगर आणि शेवगाव हे तालुके एचआयव्हीसाठी रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने विविध आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत.

1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे. 1 ते 7 डिसेंबरदरम्यान नगर शहर आणि जिल्ह्यात एड्स निमुर्लन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. पांडुरंग बोरूटे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नगर जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे. 2002 मध्ये नगर शहर आणि जिल्ह्यात एचआयव्ही बाधीतांचे प्रमाण 31.2 टक्के होते. 2017 मध्ये हे प्रमाण 2.6 टक्क्यापर्यंत खाली असल्याचे समोर आले आहे. यंदा सरकारच्यावतीने माझे आरोग्य, माझा हक्क या ब्रीदवर काम करण्यात येणार आहे.

2006 ते 2012 या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रचार, प्रबोधन आणि समुपदेशन यामुळे जिल्ह्यात 2013 पासून एचआयव्ही बाधीतांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, जिल्ह्यात नगर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यात एचआयव्ही बाधितांची संख्या वाढत आहेत. हे तालुके एड्सच्यासाठी रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रीया व समलिंगी संबंध ठेवणारे पुरूष यांच्यासाठी आरोग्य विभाग आणि स्नेहालयमार्फत आरोग्य प्रकल्प

राबवण्यात येत आहे. या प्रकल्पात एफएसडब्ल्यू, एमएसएम यांना आरोग्य तपासणी, एचआयव्ही तपासणी, गुप्तरोग व त्वचारोग तपासणी सेवा पुरवण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालय आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट या दोन ठिकाणी एड्सवर मोफत औषध उपचार करण्यासाठी एआरटी सेंटर कार्यरत आहे.

जिल्ह्यात 15 हजार 348 रुग्णांनी एचआयव्ही बाधितांना मोफत उपचार आणि औषध देण्यात येत आहेत. जिल्ह्यात नगर शहर आणि जिल्ह्यात दर महिन्याला 9 ते 10 हजार लोकांची एचआयव्हीची तपासणी करण्यात येत असून त्यात 60 ते 70 जणांना एचआयव्हीची लागण होत असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात 2002 पासून 2017 पर्यंत 18 हजार 599 रुग्णांना एचआयव्हीची लागण झालेली आहे. यातूल 2007 पासूनच्या आकडेवारीनूसार 2 हजार 249 रुग्णांची मृत्यू झालेला आहे. मात्र, ही आकडेवारी नोंदणीकृत रुग्णाची आहे. ज्यांची नोंदणी झालेली नाही. त्याचे पुढे काय झाले हे सांगण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.

नगर शहरात 450 नोंदणीकृत व्यवसाय करणार्‍या महिला आहे. मात्र, व्हाईट कॉलर भागात मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यातून खासगी व्यवसाय करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याची कोठेही नोंद नाही. हा प्रकार उच्च समाजात सर्रास सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही.

आरोग्य खात्याने केलेल्या पाहणीत गेल्या 2 वर्षात एचआयव्ही बांधीतांमध्ये 35 ते 49 वय असणार्‍या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अन्य वयाच्या प्रवर्गात हे प्रमाण अत्यंत कमी असून याला समुपदेशन आणि प्रचार, प्रसिध्दीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नगर शहरात 450 नोंदणीकृत व्यवसाय करणार्‍या महिला असून त्यातील 100 ते 150 होमबेस व्यवसाय करत आहेत. यामुळे एचआयव्हीचा धोका वाढला असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नव्याने एचआयव्ही बाधीतांमध्ये अशिक्षित, शेत मजूर, विविध क्षेत्रातील कामगार, एमआयडीसी कामगारांची संख्या अधिक आहे. सुशिक्षित आणि कॉलेज तरूण, तरूणीमध्ये हे प्रमाण घटले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

 

LEAVE A REPLY

*