डायरीमुळे वकील एकमेकांच्या संपर्कात : न्या. प्रकाश माळी

0

वकिलांना लॉयर्स सोसायटीच्या डायरीचे वितरण

अहमदनगर :  डायरीमुळे सर्वच वकील एकमेकांच्या संपर्कात राहणार आहे. न्यायालयाचा परिसर प्रशस्त असून, सर्व विभागांना योग्य जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वकिलांची पार्किंग असलेल्या जागेत एडीआर (मध्यस्थी सहायता केंद्र) सेंटर उभारण्याचे विचाराधीन असल्याचे प्रधान जिल्हा सत्र न्यायधीश प्रकाश माळी म्हणाले.
जिल्हा न्यायालयात अहमदनगर लॉयर्स को ऑप सोसायटीच्या सन 2018 च्या डायरीचे प्रकाशन न्यायधीश माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड.नानासाहेब पादीर, अ‍ॅड.तुलशीराम बाबर, व्हाईस चेअरमन अ‍ॅड.प्रभाकर शहाणे, सचिव अ‍ॅड.हाजी रफिक बेग, शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश ठोकळ व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड. पादीर म्हणाले की, 735 सभासद असलेल्या सोसायटीत चार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. सभासदांसह वकिल मंडळीना दरवर्षी डायरी उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये स्टॅम्पचा तपशील व महत्त्वाचे सेशन नमुद करण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हा सत्र न्यायधीश माळी यांच्या हस्ते अ‍ॅड.के.एम. देशपांडे, अ‍ॅड.एस.एस. काकाणे, अ‍ॅड.माणिक मोरे, अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे, अ‍ॅड.सुभाष भोर, अ‍ॅड.तुलसीराम बाबर, अ‍ॅड.नंदू गाडे, अ‍ॅड.कर्नल के.ए. काशीद, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.मन्सूर जहागीरदार, अ‍ॅड.जॉन कुसमोडे, अ‍ॅड.सुरेश लगड, अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.सुरेश ठोकळ, अ‍ॅड.बी.एन. काकडे, अ‍ॅड.नरेश गुगळे, अ‍ॅड.बी.एस. खांडरे, अ‍ॅड.श्रीपाद तरडे आदि वकिल मंडळींना डायरीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी सोसायटीचे अ‍ॅड.रविंद्र शितोळे, अ‍ॅड.सुरेश कोहकडे, अ‍ॅड.अरविंद मुळे, अ‍ॅड.सविता साठे, अ‍ॅड.चंद्रकांत रोकडे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, अ‍ॅड.स्वाती नगरकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अ‍ॅड.सुधीर टोकेकर यांनी केले. आभार अ‍ॅड.हाजी रफिक बेग यांनी मानले.

LEAVE A REPLY

*