बार उघडला, नवस फेडला; परमिटरूममालक, लिकर ग्रुपची श्रीविशालचरणी 2 किलो चांदी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोर्टाच्या निकालाने रस्त्याकडेच्या परमिटरूमचालकांवर मोठी आफत आली होती. या निर्णयाने अनेक हॉटेलचालक धास्तावले होते. धंदा बसल्याने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. या काळात अनेकांनी देवाला नवससायास केले. परंतु बाप्पांच्या कृपेमुळे ही हॉटेल पुन्हा उघडली गेली. त्यामुळे आता नवसपूर्ती केली जात आहे. हॉटेलमालक आणि लिकर ग्रुपने माळीवाड्यातील श्रीविशाल गणेशाला दोन किलो चांदी अर्पण केली.
हॉटेल परमिटरूप व लिकर ग्रुपचे सदस्याही नित्यियमाने श्री विशाल गणेशाच्या दर्शंनासाठी येतात. त्यामुळेच सर्वानुमते दोन किलो चांदी अर्पण करण्याचा निर्णय झाला. मंदिराच्या वैभावात भर टाकण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रुपचे अर्जुनराव बोरूडे यांनी सांगितले.
याप्रसंगी अर्जुनराव बोरुडे, बाबुराव जाधव, नंदू एकाडे, मधुकर कोतकर, नंदू राऊत, मुकेश चुग, खेमीचंद बजाज, रावसाहेब बोरुडे, राहुल बजाज, राजू बोरुडे, बबन शिंदे, बंटी आगरवाल, मिलिंद गायकवाड, अर्जुन लगड, किशन गायकवाड, अमोल धाडगे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, मच्छिंद्र सांगळे, अण्णा आंबेकर आदींसह ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अ‍ॅड. अभय आगरकर म्हणाले, शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामासाठी अनेक संस्था, मंडळे, असोसिएशन,ग्रुप व व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यातून हे भव्य-दिव्य असे कलाकुसरीने नटलेले मंदिर उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

*