इंडियाज् बेस्ट स्टुडंट कॉन्टेंस्ट स्पर्धेत नगरच्या सचिन भालेरावची निवड 

0
अहमदनगर :  राव आय.आय.टी.फौंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंडियाज् बेस्ट स्टुडंट कॉन्टेंस्ट 2017 ही परिक्षा संपूर्ण भारतात एकाचवेळी 5 विभागात घेण्यात आली. या परिक्षेसाठी दादा चौधरी विद्यालयातील इ.9 वी  व 10 वी चे एकूण 36 विद्यार्थी बसले होते. यात विद्यालयातील विद्यार्थी सचिन भालेराव याची फेज-2 साठी राज्यपातळीवर निवड करण्यात आली आहे. त्याची मौखिक चाचणी पुणे येथे होणार आहे. त्यास विषय शिक्षक डी.एम.शिंदे व सौ.वर्षा गुंडू यांचे मार्गदर्शन लाभले.
या परिक्षेसाठी गणित, बुद्धीमत्ता चाचणी व विज्ञान हे विषय होते. परिक्षा इंग्रजी माध्यमातून व निगेटीव्ह गुणांसह होती. विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा हे नेहमीच स्पर्धा परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी आग्रही असतात.
सचिन भालेराव याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्यावतीने हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, उप कार्याध्यक्ष अजित बोरा, सहसचिव डॉ.पारस कोठारी, कार्य.सदस्या रोहिणीताई शिवलकर, बागडपट्टी शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, मुख्याध्यापक विठ्ठल ढगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुभाष येवले आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*