दादा, तुम्हीसुध्दा!

0

काकांमागे ग्रहणाभिषेक;
आता पळ कशासाठी?

राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर यांचा महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरताना तुम्हीच ‘महापौर राष्ट्रवादीचाच होणार’ असे अवेशात सांगितले होते. पुढं संपतशेठने ‘तयारी पूर्ण केली, पण तुमचा होमवर्क कमी पडला.’ त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर जे बितलं ते तुमच्यासह अवघे नगरकर जाणताहेत. नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत तुमच्याच मुखातून भाजपशी सोयरीक करण्याचा विषय छेडला गेला. आता तुम्ही मात्र ‘मी नाही त्यातली… असा साळसूदपणाचा आव आणलाय. मुंबईच्या बैठकीत मोठ्या साहेबांनी (शरद पवार) तुमची खरडपट्टी काढलीय, ती काही उगाच नाही. महापालिकेतील सोयरीकीला तुम्ही साक्षीदार असल्याचे मोठ्या साहेबांनाही कळून चुकले. नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी सोयकरीकीला आमदार जगताप बापलेक जितके जबाबदार तितकेच तुम्हीही!
पुतण्यामुळं काका राजकारणात अडचणीत आल्याची अनेक बड्या नेत्यांची उदाहरणे राज्यात आहेत. नगरमध्येही ‘दादा’ असलेल्या काकांना अडणीच्या वाटेने जावं लागलं. त्यामागचं गणित फारच वेगळं आहे. राष्ट्रवादीचा महापौर होईल असा दावा करताना दादाभाऊंनी संपत बारस्कर यांना महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरायला लावला. खरं तर संपतशेठ जगतपांपेक्षा दादाभाऊंचे खासम्खास. संपतशेठची तयारी पूर्ण झाली, पण दादाभाऊ मागे ‘ग्रहणाभिषेक’ लागला. (संपतशेठ कशाला?, या अट्टाहसाचा) त्यामुळं दादांनी ‘होमवर्क’ मध्येस सोडून देत अधुराच ठेवला. त्यापूर्वीच नगरसेवकांची पहिली बैठक झाली. त्याला तुम्ही उपस्थित होता. तुमच्याच मुखातून भाजपसोबत राष्ट्रवादीच्या सोयरीकीचा विषय छेडला गेला. त्यावेळी तुम्हीच ‘आपले बहुमत होत नाही, त्यामुळं बिनशर्त पाठिंब्याशिवाय पर्याय नाही’ असं बोलले, असे नगरसेवक खासगीत सांगतात. त्यानंतरच जे राजकीय रामायण-महाभारत झाले, ते नव्याने सांगण्याची गरज नाही.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे आवोभगत तुम्ही केले. तुमचा जर ‘सोयरीकीत हातच नव्हता’ तर मग पाहुण्यांना माघारी का नाही धाडले. पण ते धाडस त्यावेळी तुम्ही दाखवले नाही, त्याअर्थी पाणी कुठंतरी मुरतंय, हे नक्कीच! आता तुम्ही म्हणता माझा या सोयरीकिशी संबंध नाही. बरं तुमचं म्हणणं खरं मानलं तर मग मोठ्या साहेबांनी तुमची झाडाझडती घेतली ती कशाच्या आधारावर! त्यांच्यापर्यंत सगळ्या खबरा पोहचल्या. त्यामुळंच तुमच्यावर शब्दप्रहार झाले. त्याने तुम्ही घायाळ झालात, पण ते सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कारण ‘झाकली मुठ..’
आता राष्ट्रवादीचे नगरसेवक अन् आमदारही अडचणीत सापडले. त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचे सोडून तुम्ही त्यांना वार्‍यावर सोडून बाजुला झालात. मी नव्हतोच असं तुम्ही भासवलं, पण मोठ्या साहेबांच्या कचाट्यता सापडलाच. ‘दादा तुम्हीसुध्दा’ असे म्हणत पवारसाहेबांनी झाडाझडती घेतली ती उगाचच नाही!

‘कॉप’साठी काप
नगरसेवक होण्यासाठी किती ‘वाटप’ करावं लागतं याच्या चर्चा चवीने ऐकावयसा मिळते. तुम्हाला मात्र मागच्या दाराने महापालिकेत ‘एन्ट्री’ हवी असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पद येणार आहेत. त्यातील एक दादांना हवं आहे. अर्थात ते पद कोणाला हे ठरविण्याचा अधिकार आमदार जगताप यांना असल्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. पण पक्षाच्या नगरसेवकांनी ते देण्यास विरोध दर्शविला आहे. त्याचा राग मनात धरून तुम्ही पक्षाकडे कुभांड रचल्याचे सांगण्यात येते. कॉपसाठी नगरसेवकांच्या राजकारणाला काप लागला, तो कोणामुळं?. आम्ही ‘लक्ष्मीवर पाणी फेरून’ नगरसेवक झालो, तुम्ही निवडणुकीतून पळ काढला, आता मागच्या दाराने एन्ट्री कशी काय? असे नगरसेवकांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजले.

तेव्हाही काढला पळ
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. पुतण्या माजी महापौर अभिषेकसाठी ‘सेफ वार्ड’ नसल्याचे कारण पुढं करत महापालिका निवडणुकीतून पळ काढला. 5 नंबरमधून उमेदवारी करू की सहामधून? असा चक्रावून टाकणारा प्रश्‍न तुमच्यासमोर होता. आमदार जगताप वारंवार ‘कोणत्या वार्डातून लढणार’ अशी विचारणा करत होते, अभिषेकचं मात्र शेवटपर्यंत काहीच ठरलं नाही. अखेरच्या क्षणी महापालिका निवडणुकीतून पळ काढला. त्यामुळं 5 आणि 6 या दोन वार्डात राष्ट्रवादीचा उमेदवार देताना नाकीनऊ आले. हसू नको म्हणून मग कोणाच्यातरी गळ्यात उमेदवारी मारली गेली. पण त्याचा परिणाम आठही जागा गमवण्यात झाला. दोनपैंकी कुठल्यातरी एका वार्डात माजी महापौर अभिषेक कळमकर हे उमेदवार असते तर किमान चार-पाच सीट तरी लागले असते. त्यातून राष्ट्रवादी सत्तेची शिडी चढली असती. महापौर पदाच्या कार्यकाळातील ‘कर्तृत्व’ नडले अन् महापालिका निवडणुकीतून अलिप्त रहावे लागले, अशी चर्चा आहे. आता ती खरी की खोटे तुम्हीच जाणोत.

LEAVE A REPLY

*