अहवालानंतर गोंधळी शिक्षकांवर कारवाई : माने

0

आज नोटीसा देण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा करत शिक्षकीपेशाची प्रतिमा मलिन करणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी घेतला आहे.
शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांचा अहवाल आल्यानंतर गोंधळी शिक्षकांना नोटीसा काढण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. दरम्यान, गोंधळ घालणार्‍या शिक्षकांची नावे जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आज (बुधवारी) संबंधीतांना नोटीसा देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
24 सप्टेंबरला जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सत्ताधारी शिक्षकांच्या मंडळा विरूध्द विरोधी मंडळाचे शिक्षक यांच्या वादावादी होवून 2 तास राडा झाला. यावेळी हाणामार्‍या, शिव्या देणे, बँकेचा अहवाल फाडणे आणि वाद सोडवण्यासाठी आलेल्या पोलीसांवर गुरूजी धावून गेले होते.
यामुळे 15 शिक्षकांना पोलीसांनी पकडून पोलीस ठाण्यात पोहचवले होते. यातील 13 शिक्षकांना प्रतिबंधात्मक नोटीसा देवून सोडून देण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची मोठी बदनामी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी माने संतप्त झाले आहेत.
त्यांनी शिक्षणाधिकारी काटमोरे यांन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर माने संबंधीत गोंधळी शिक्षकांना नोटीस बजावणार आहेत.  दरम्यान, शिक्षण विभागातील कर्मचारी सध्या गोंधळ घालणार्‍या शिक्षकांची नावे संकलित करण्यात व्यस्त आहे. बुधवारपर्यंत ही नावे संकलित होवून संबंधीत शिक्षकांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

  शिक्षण विभाग कारवाई करणार्‍या शिक्षकांची नावे जाहीर केल्यानंतर खरा गोंधळ उडणार आहे. सभेला उपस्थित असणार्‍या शिक्षकांना एकमेंकाच्या नावे माहिती आहे. कारवाईसाठी आपले नाव आले आणि विरोधी गटातील शिक्षकाचे नाव का आले नाही, यावरून नव्या वादाला सुरूवात होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात कानावर आली.  

LEAVE A REPLY

*