331 शालाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात

0

जिल्हा परिषद : प्राथमिक शिक्षण विभागाची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऊस तोडणी कामगार, विटभट्टी कामगार यांच्या स्थलांतरामुळे त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहतात. या कामगारांचा एकही मुलगा शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने 331 शालाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शालाबाह्य विद्यार्थी राहणार नाहीत. यासाठी मोहीम राबवून ऊस तोडणी कामगार, विटभट्टी कामगार यांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण विभागाच्या कामगिरीत 331 शालाबाह्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहेत.
अकोले तालुक्यात 36, संगमनेरमध्ये 121, कोपरगावमध्ये 6, श्रीरामपूरमध्ये 31, राहुरी 14, नेवासा 81, शेवगाव 22 आणि श्रीगोंदा तालुक्यात 20 शालाबाह्य मुले आढळली होती. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.
याासह जामखेडमध्ये 2, पारनेरमध्ये 1 आणि पाथर्डी 1 हंगामी वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून याठिकाणी 937 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. याठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी पडताळणी करण्यात येणार असून यासाठी तीन पथके तयार करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*