जिल्हा कृषी अधिकारी नलगेंची बदली, राठी हजर

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांची कर्जत उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून बदली झाली.

त्यांच्या जागी नंदुरबार कृषी उपसंचालक सुनीलकुमार राठी हे गुरुवारी हजर झाले आहेत.

कृषी विकास अधिकारी नलगे यांनी साडेचार वर्षाच्या कार्यकाळात वरिष्ठ अधिकारी-विभागातील कर्मचारी व पदाधिकारी-सदस्यांबरोबर समन्वय ठेवत काम केले.

मोठ्या संख्याने बायोगॅसचे बांधकाम, 12 पंचायत समित्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, विशेष घटक योजनेचे नियोजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतर्ंगत 89 विहीरींना मंजूरी आदी कामे नलगे यांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण केलेली आहेत.

राठी हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील आहेत.

यापूर्वी ते नाशिक येथे जिल्हा कृषी अधिकारी म्हणून साडेचार वर्ष व तालुका कृषी अधिकारी निफाड येथे सात वर्ष सेवेत होते.

राज्य कृषी विभागापाठोपाठ जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात.

LEAVE A REPLY

*