झेडपी दाखविणार ‘टॉयलेट एक प्रेम कथा’

0

हागणदारी मुक्तीसाठी अभिनव उपक्रम 

अहमदनगर (प्रतिनिधी)– वारंवार सूचना, आदेश आणि कारवाई करूनही जिल्ह्यात हागणदारीमुक्तीकडे कानाडोळा झालेला आहे. यामुळे कानाडोळा करणार्‍या गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी, साहय्यक गट विकास अधिकारी, गट संसधान कर्मचारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि पदाधिकारी यांना टॉयलेट एक प्रेम कहाणी हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता कक्षाच्यावतीने घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात पारनेर आणि अध्यक्षा शालीनीताई विखे यांच्या राहाता तालुक्याने आघाडी घेतली आहे. या ठिकाणी शंभर टक्के हगणादारी साठी प्रयत्न झालेले आहे. मात्र अन्य तालुक्यात ही स्थिती समाधानकारक नाही. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे गावात शौचालय बांधून घेण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत जिल्हा परिषद पातळीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्षा विखे, संपूर्ण स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके या प्रयत्न करत आहे. अधिकारी पातळीवर दरमहिन्यांला आढावा घेण्यात येत आहे. यासह शौचालयासाठी अनुदानही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

मात्र, काही ठिकाणी समाधानकारक स्थिती नाही. उघड्यावर जाणार्‍यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यातच टॉयलेट एक प्रेमकथा हा हिंदी चित्रपट आलेला आहे. या चित्रपटात शौचालयचे महत्व, त्याचे फायदे दाखवण्यात आलेले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने हागणदारी मुक्तीकडे दुर्लक्ष करणार्‍यांना गांधीगिरी करत हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हागणदारी मुक्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या 511 गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी, साहय्यक गट विकास अधिकारी, गट संसधान कर्मचारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि पदाधिकारी यांना टॉयलेट एक प्रेम कहाणी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता कक्षातून या सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी तिकीटाचे पैसे पाठण्यात येणार आहे. या सर्वांना तालुक्याच्या ठिकाणी अथवा जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहावा, असे पत्र त्यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय स्वच्छ भारत मिशनच्या माध्यामातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संपूर्ण स्वच्छता कक्षाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*