जि.प. कर्मचारी पतसंस्थेची कर्जमर्यादा आठ लाख

0

संजय कडूस : व्याजदरात अर्धा टक्क्याने कपात  

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या पोट नियमास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी मान्यता दिली आहे. यामुळे आता कर्मचारी सोसायटीच्या सभासदांना आठ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय कडूस यांनी दिली.
यात 10 ते 15 हजार वेतन असणार्‍या सभासदांना तीन लाख, 15 ते 20 लाख रुपये वेतन असणार्‍यांना साडेतीन लाख, 20 ते 25 हजार रुपये वेतन असणार्‍यांना पाच लाख रुपये, 25 ते 30 हजार रुपये वेतन असणार्‍यांना सहा लाख रुपये आणि 31 हजारांच्या पुढे कर्ज असणार्‍या सभासदांना आठ लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
या कर्जाची फेड 108 हफ्त्यात करण्यात येणार असून त्यामध्ये 9 हफ्तेच्या तहकुबीचा समावेश राहणार आहे. सभासदांच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व सर्व प्रकारच्या ठेवीवरील व्याजदर 1 सप्टेंबरपासून अर्धा टक्क्याने कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
सभासदांनी सर्वसाधारण सभेमध्ये कर्जावरील व्याज दरात कपात करावी व सर्वसाधारण कर्जामध्ये वाढ करावी अशी जोरदार मागणी केली होती. या मागणीचा विचार व ठेवीचा अभ्यास करून हा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. भविष्यात सभासदांना कमीतकमी व्याज दरात कर्ज देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे त्यादृष्टीने संचालक मंडळ प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्ष अशोक काळापहाड यांनी सांगितले.
यावेळी संचालक अरुण जोर्वेकर, भरत घुगे, सोपान हरदास, अरुण शिरसाठ, संजय चौधरी, विलास वाघ, प्रताप गांगर्डे, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन जायभाये, राजाबापू पाठक, वालचंद ढवळे, नारायण बोराडे, इंदू गोडसे, शशिकांत रासकर, सुभाष कराळे, संतोष नलगे, उषा देशमुख, राजेंद्र म्हस्के, संजय बनसोडे, व्यवस्थापक अविनाश शिदोरे, उप व्यवस्थापक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*