11 हजार अपंग विद्यार्थ्यांसाठी मंजुर अडीच कोटी रुपयांची झेडपीला प्रतिक्षा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- अपंग समावेशित शिक्षण विभागा अंतर्गत यंदा जिल्ह्यातील 11 हजार अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे.मात्र, विद्यार्थी संख्येनूसार राज्याकडे मंजुर अडीच कोटी रुपये अद्याप जिल्हा परिषद स्तरावर अप्राप्त आहेत. त्यामुळे अपंग विदयार्थ्याची विविध साहित्य खरेदी व शिबिरे रखडली आहे.
गतवर्षी अपंग विद्यार्थी संख्या जास्त होती. 2 कोटी 94 लाख रुपये मंजुर झाले सदर रक्कम जुलै अखेरपर्यत 2016 मध्ये प्राप्त झाला होती.यंदा मात्र ऑगस्ट महिन्यातही रक्कम प्राप्त झालेली नाही.संबधित विभागाने अपंग विद्यार्थ्यासाठी बाब व तालुकानिहाय नियोजन करुन ठेवले असताना केवळ निधीअभावी सर्व कार्यक्रम रखडला आहे.
अंगणवाडीमधील 0 ते 6 वयोगटातील बालकांसह इयत्ता इयत्ता 1 ली ते 12 वी असे एकूण 10 हजार 922 विद्यार्थी आहेत. यामध्ये मंददृि,अंध, कर्ण दोष, वाचा दोष, अस्थिव्यंग, मंतीमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात आदी विविध प्रकारचे अंपगत्व आहे. संबधित विदयार्थ्यासाठी शिबिरे, आरोग्य, शस्त्रक्रिया, साहित्य साधने, बेलबुक, लार्च बिट, तीव्र अपंगाना मतदनीस प्रवासखर्च, थेरपी सेवा, शिक्षक-पालक प्रशिक्षण, विशेष शिक्षकांचे वेतन आदींसाठी सदर मंजुर रक्कम खर्च केली जाते. शेैक्षणिक वर्ष सुरु होवून सहा महिने लोटले तरी, अपंग विद्यार्थ्यासाठी मंजुर निधी मिळत नसल्याने शिक्षक व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तालुकानिहाय संख्या – 
अकोले-889, संगमनेर-1331, कोपरगाव-615, राहाता-888, राहुरी-1065, श्रीरामपूर-679, नेवासा-454, शेवगाव-672, पाथर्डी-792, जामखेड-669, कर्जत-688, श्रीगोंदा-506, पारनेर-911, नगर-763 आदी अपंग विद्यार्थी आहेत.

शस्त्रक्रिया रखडल्या – 
एकूण विद्यार्थ्यामध्ये तीव्र अंपग विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय आहेत.त्यांच्यावर वेळेत शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असताना निधीअभावी रखडल्या आहेत.

LEAVE A REPLY

*