अपंगाचा 3 टक्के अखर्चित 1 कोटी निधी झेडपीकडे

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गावातील अपंगासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पादनातील 3 टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी तो खर्च केला नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेने सदर अखर्चित निधी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून एकत्रितपणे अपंग व्यक्तिंना वैयक्तिक लाभ देण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतील एकूण उत्पादनाच्या 3 टक्के निधीतून अपंगासाठी साहित्य खरेदी किंवा अन्य उपक्रम राबविणे बंधनकारक असताना बहुसंख्य ग्रामपंचायती याकडे कानाडोळा करतात. याप्रकणी जिल्हा प्रशासनाने कोणतीच कडक कारवाई न केल्याने काळ सोकावला गेला. त्यामुळेच चार-चार वर्षाचा अपंगासाठीचा निधी अखर्चित राहिला.सदर खर्चित निधी जिल्हा परिषदेकडे एकत्रित करण्यात येऊन जिल्हास्तरावर अपंगाच्या चार योजनांसाठी तो खर्च केला जाणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितिन उबाळे यांनी दिली.

1 कोटी 17 लाख रुपये चार योजनांसाठी खर्च –
ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे प्राप्त अखर्चित 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी चतार योजनांसशं खर्च केला जाणार आहे.यामध्ये अपंग व्यक्तिने अपंग व्यक्तिशी विवाह केल्यास 10 लाख, अपंग महिला सक्षमीकरणासाठी 19 लाख 39 हजार, अपंग पुनवर्सन केंद्र, थेरपी सेंटर सुरु करणे यासाठी 50 लाख, अतितीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तिसांठी निवारा गृहाला सहाय्यक अनुदान देणे आदीसाठी खर्च करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*