Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

सोमवार पासून कोरठणची यात्रामहोत्सव

Share

अहमदनगर- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील,पिंपळगांवरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथील यात्रामहोत्सव येत्या सोमवार पासून सुरु होणार आहे. २१ ते २३ जानेवारी २०१९ या दरम्यान यात्राउत्सवाचे आयोजनकरण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. तसेच आनंदाचा येळकोट’,‘‘येळकोट येळकोट जय मल्हार’’या जयघोष करतात.

सन २०१९ या नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असुन,धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या,भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्व आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो.

यावेळी शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरु होते. यात्रा पूर्व नियोजसाठी तहसीलदार गणेश मरकड यांनी सर्व विभागाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार ट्रस्ट व प्रशासन तयारी करत आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!