अहमदनगर : वन्यजीव सप्ताह निमित्त प्रथमच भव्य फोटो फेअरचे आयोजन

0
अहमदनगर  : दि ७ व ८ ऑक्टोबर २०१७ रोजी नगरच्या फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्था आयोजीत नगर जिल्हयात प्रथमच भव्य फोटो फेअरचे आयोजन टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे.
वन्यजीव सप्ताह निमीत्त राज्यस्तरीय वाईल्ड लाईफ फोटो कॉम्पीटिशन आयोजीत करण्यात आलेली होती. या स्पधैसाठी राज्यभरातून ३५० इंन्ट्री आलेल्या आहेत याचे बक्षीस वितरण नगर जिल्हयाच्या वनप्रमुख मा.ए. लक्ष्मी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात प्रथम पारितोषीक रु. १११११, द्वीतीय पारितोषीक रु. ८८८८, तृतीय पारितोषीक रु. ५५५५ व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. २२२२ असे दोन बक्षीसे वाटप करण्यात येणार आहे.
 प्रसिद्ध फोटोशॉप तज्ञ प्रवीण बनसोडे यांचे नाममात्र प्रवेश फीमध्ये वर्कशॉप देखील असणार आहे. त्यामध्ये ७०-७०च्या बॅचप्रमाणे ते प्रात्यक्षिक घेणार आहेत. फोटोग्राफर बंधुनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या वतीने आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*