Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीकडून खून

Share

घारगाव (वार्ताहर) -चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा पतीकडून डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर येथे घडली. शांता प्रकाश धांडे (वय 32, रा. आंबेवंगण, ता. अकोले) असे मयत विवाहीतेचे नाव आहे.

प्रकाश नामदेव धांडे व त्याची पत्नी शांता हे दोघे श्रीगोंदा भागात एका वस्तीगृहावर काम करत होते. शांता हीची आई आजारी असल्याने हे पती-पत्नी मुंबईला गेले. तिला भेटले. शांता हिची बहिण कांता ही संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर येथे राहते. तिला भेटण्यासाठी तिघेही मुंबईहून जवळेबाळेश्वर येथे आले. रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले.

त्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास प्रकाश नामदेव धांडे याने पत्नी शांता हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा खून केला. घटनेनंतर प्रकाश धांडे याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती कामगार पोलीस पाटीलाने घारगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान फरार झालेल्या प्रकाश धांडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!