Breaking : देहरेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम कोसळले

0
सार्वमत ब्रेकिंग
अपघातात ८ कामगार जखमी 
अहमदनगर – देहरे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे नवीन बांधकाम हे मंगळवार (दि.१२) रोजी सकाळच्या सुमारास कोसळले असल्याची घटना घडली आहे. हे बांधकाम कोसळल्यामुळे काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच संबंधित घटनास्थळी मनपा कर्मचारी, एमआयडीसी चे सहा.पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे पोलीस पथकासह तसेच अतिक्रमण विभागाचे पथक देखील रवाना झाले आहे.

(Photo)

दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील देहरे नगर मनमाड रोड वर सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकामचे काम सुरु असताना सदर बांधकाम कोसळले. यावेळी कामावर असणारे 8 लोक या अपघातात जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तातडीने दवाखान्यामध्ये दाखल केले आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच घटनास्थळी एमआयडीसी फायर सर्व्हिस, 108 अंबुलान्स, पोलीस पथक, स्थानिक गावकरी मदतीस पोहचले. या ढिगाऱ्याखाली खाली कुणी दगावले आहे का याबाबत शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

*