Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर तालुक्यातील विळद गावात ग्रामपंचायतीच्यावतीने आज ट्रॅक्टर ब्लोअरने औषध फवारणी करण्यात आली व परिसर निर्जंतुक करण्यात आला. सोडिअम हायपोक्लोराईट या औषधाची फवारणी करण्यात आली.

पाण्याची टाकी, गावठाण वस्ती, अडसुरे वस्ती, विळद स्टँड परिसर, मुख्य रस्ते, गावांतर्गतचे रस्ते, अडगळीचा परिसर व लोकवस्तीच्या ठिकाणी आज फवारणी करण्यात आली तर उर्वरित वस्त्यांवर उद्या फवारणी करण्यात येणार आहे. फवारणीसाठी सरपंच मनीषा बाचकर, रासपचे संजय बाचकर, ग्रामविकास अधिकारी सागर खळेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहकार्य करित आहेत.

- Advertisement -

दरम्यान गावात लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीनेही उपाययोजना सुरु केल्या आहेत. नागरिकांनी घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून तसेच मुंबई, पुणे व अन्य शहरांतून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी तसेेच विदेशातून, अन्य शहरांतून गावात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:हून प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या