अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या 208 कुटुंबांना विखे कुटुंब दत्तक घेणार

0

“पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्य योजना”

पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्य योजनेची 15 जून पासून होणार प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु होणार आहे.
ज्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत त्या कुटुंबातील मुलींचे लग्न,शैक्षणिक खर्च , कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी उपलब्ध करून देणार ,

“शेतकरी आत्महत्या कुटुंबातील व्यक्तींची जीवनभर मोफत आरोग्य सेवा विखे हॉस्पिटल तर्फे करण्यात येणार तसेच अपघाती विमा उतरवणार आणि त्याचा प्रिमियम विखे पाटील ट्रस्ट भरणार” अशी घोषणा डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.

ही योजना विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच येत्या 15 जून पासून करण्यात येणार आहे.

तसेच पांगरमल दारुकांड मधील मृत कुटुंबियांतील व्यक्तींना 25 हजार रुपयांची मदत देणार आहे.

आज अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परीषदेत डॉ.सुजय विखे पाटील ह्यांनी ही माहीती दिली.

LEAVE A REPLY

*