Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

अय्यप्पा मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराचा रौप्य महोत्सव दि. 16 नोव्हेबर पासून सुरु होत आहे हे मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी, गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या रौप्य् महोत्सव उत्सवानिमित्त 60 दिवसांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये या उत्सवात ज्या कलावंतांना व भजन मंडळास सेवा म्हणून या ठिकाणी कार्यक्रम, भजन संध्या आयोजित करण्याची संधी देण्यात येणार आहे.

16 नोव्हे ते 14 जानेवारी पर्यंत दर शनिवारी व रविवारी तसेच विशेष दिनमध्ये सांस्कृतिक, आध्यत्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक नाटिका, नृत्य, गायन, वादन, भजन, प्रवचन, भारूड, दांडिया, गरबा तसेच विविध राज्याची सांस्कृतिक व पारंपरिक कला सेवा म्हणून सादर करू शकतात.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी नवीन व्यासपीठ तयार करण्यात आले असून कलाकारांना हे स्टेज, साउंड सिस्टिम, बैठक व्यवस्था आदी सुविधा मंदिर कमिटी उपलब्ध करून देणार आहे. ज्या कलावंतांना व भजन मंडळास सेवा म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करवायचे असतील त्यानी आपली नाव नोंदणी मंदिरात करावी किंवा अधिक माहितीसाठी पुढील मो न वर संपर्क करावा खजिनदार- गोपी बालकृष्णन, सहसेक्रेटरी – रामचंद्र नायर, सेक्रेटरी- शंकर बेबी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनअध्यक्ष के के शेट्टी , उपाध्यक्ष-पी श्रीधरन यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!