Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

प्रोफेसर कॉलनीत विद्यार्थ्याची सुसाईड

Share
परीक्षा फॉर्म न भरल्याने रागावले होते वडील
अहमदनगर (प्रतिनिधी) – जेईई फॉर्म न भरल्याने वडील रागावले म्हणून बारावीत शिकणार्‍या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. 3) रात्री आठ वाजता प्रोफेसर कॉलनी परिसरातील मयूर कॉम्प्लेक्स परिसरात बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. सत्यम विजय माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सत्यम हा शहरातील सारडा महाविद्यालयात बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होता. बुधवारी जेईई परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत होती. सत्यमने फॉर्म न भरल्याने त्याच्यावर वडील रागावले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून सत्यमने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!