सातपुते, फुलसौंदर, दुल्लम डिसक्वॉलिफाय

0

कोर्ट ऑर्डर, सेनेला शॉक

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापौरांनी पदाचा गैरवापर करून स्थायी समितीमध्ये नियुक्त केलेल्या सदस्यांच्या अपात्रतेवर औरंगाबाद खंडपीठाने आज शिक्कामोर्तब केल्याची माहिती अ‍ॅड. प्रसन्न जोशी यांनी दिली. कोर्टाच्या या निकालाने सत्ताधारी सेनेला शॉक बसला असून अमृत योजनेची मंजुरीही वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेत सेनेची सत्ता आल्यानंतर सुरेखा कदम महापौर पदावर विराजमान झाल्या. स्थायी समितीचे सदस्य नियुक्त करताना संख्याबळाचा विचार न करता त्यांनी पदाचा गैरवापर करून सेनेचे सदस्य नियुक्त केले. त्यामुळे महापौरांनी नियुक्त केलेले सदस्य दिलीप सातपुते, मनोज दुल्लम आणि सुनीता फुलसौंदर यांना अपात्र करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे केली होती. राज्य शासनाने या तिघांना अपात्र करत असल्याचा आदेश काढला. त्याविरोधात सेनेच्या या तिघांनी औरंगाबाद कोर्टात धाव घेत शासन आदेशाला स्थगिती मिळविली होती. आज त्यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने शासन आदेश कायम करत तिघांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले आहे.

सातपुते, दुल्लम आणि फुलसौंदर हे तिघेही स्थायीचे विद्यमान सदस्य आहेत. अमृत योजनेच्या निविदेला मंजुरी देताना त्यावर त्यांनी सह्या केल्या आहेत. नेमणुकीपासून अपात्र केल्याचा आदेश निघाल्याने या तिघांच्या सह्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यामुळे अमृत योजनेची मंजुरीही वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

LEAVE A REPLY

*