खेळामुळे आरोग्य निरोगी राहते ः निखील वारे

0
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेनिस बॉल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या तीन वर्षांपासून माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेनिस बॉल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेमध्ये या वर्षी 8 संघांनी सहभागी घेतला आहे. ही स्पर्धा एपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित केली जाते. क्रिकेट खेळामुळे सर्व जातीधर्मातील खेळाडू एकत्र येऊन क्रिकेट खेळला जातो. त्यामुळे एकमेकातील विचारांची देवाणघेवाण होते. खेळामुळे माणसाचे आरोग्य निरोगी राहते, असे प्रतिपादन काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस निखील वारे यांनी केले.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेनिस बॉल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस निखील वारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दत्ता गाडळकर, मुद्दसर तांबटकर, शहेनवाज पठाण, डॉ. विशाल घंगाळे, दिनेश साठे, शहीद खान, परवेज शेख, शाहीद काझी, दिनेश लोंढे, पंकज सादरे, डॉ. इम्रान शेख, शहनवाज सय्यद, मोहसीन काझी आदींसह खेळाडू उपस्थित होते.

दत्ता गाडळकर म्हणाले की, सावेडी उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेनिस बॉल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून, यात खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी होतात. क्रिकेटपटूंसाठी नेहमीच ही स्पर्धा हक्काचे व्यासपीठ ठरत आले आहे, असे ते म्हणाले.
मुद्दसर तांबटकर म्हणाले की, प्रत्येकाने खेळाची आवड जोपासली पाहिजे. खेळ कुठलाही असो तो नेहमीच फायदेशीर असतो. खेळाचे अनेक फायदे आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धांचे वरचेवर आयोजन होणे गरजेचे आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेनिस बॉल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा आम्ही आयोजित करीत असून, शहर स्तरावर आयोजित केली जाणार ही स्पर्धा यापुढील काळात व्यापक करण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*