सोशलच्या वॉलवर दंगलीची चाल

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– सोशल लिंकचा वापर करून धार्मिक भावना दुखविण्यामागे नगर शहरात दंगल घडवून आणण्याच्या डाव असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येऊ पाहत आहे. पोलिसांनी या प्रकरणाकडे खास लक्ष केंद्रीत केले असून टग्यांचा शोध सुरू केला आहे. भिंगार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरात ख्वाजाजी फाऊंडेशन नावाची सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या लिंकचा गैरवापर करून वेगवेगळ्या 11 मोबाईल नंबरचा वापर करून त्या माध्यमातून अश्‍लील फोटो व शिवीगाळ असलेले रेकॉर्डिंग साईटवर अपलोड करण्यात आले आहे. ही बाब संस्थेच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी वेगवेगळ्या 11 मोबाईलधारकांविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशान कलंदर शेख यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
सामाजिक कार्याच्या हेतूने ख्वाजाजी फाऊंडेशन गृपने एक लिंक तयार केली आहे. या लिंकवर जाऊन टग्यांनी त्याचा गैरवापर केला. एका धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या जणावरांचा अश्‍लील फोटो तयार करुन गृपवर टाकण्यात आला. तसेच भावना दुखावतील असे अन्य फोटो टाकून अपशब्दांचा वापर करण्यात आला आहे. देवी देवतांचे फोटो टाकून संभाषण घडवून आणलेले संभाषण सोशल मिडियावर अपलोड करण्यात आले आहे. त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली आहे.

LEAVE A REPLY

*