Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचा गलथानपणाचा त्रास रुग्णांना

Share

मुलीवर उपचार करण्यास टाळाटाळ

श्रीगोंदा – डोळ्यातून येणारे पाणी बंद होण्यासाठी दिलेल्या औषधाचा उलटा परिणाम होऊन डोळ्यावर सूज आलेल्या मुलीवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर प्रकार श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात घडला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे मात्र या मुलीवर डोळा गमावण्याची नामुष्की ओढवली होती. अखेर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील बाबूर्डी येथील निकिता शरद शिर्के या दहा वर्षांच्या मुलीला डोळ्यातुन येणारे पाणी बंद होण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आली होती. मागील आठवड्यात आरोग्य विभागाने पाथर्डी येथे आरोग्य शिबिरास नेले होते. मात्र पाथर्डी येथे दिलेल्या औषधाने निकीताच्या डोळ्यावर उलटा परिणाम झाला व डोळ्याला सूज आली. या मुलीला घेऊन पालक श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गेले.

मात्र अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन उपचार करणे टाळले. व खासगी डोळ्याच्या दवाखान्यात मुलीला दाखवा असा सल्ला देऊन जबाबदारी टाळली. वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी श्रीगोंदयातील खाजगी दवाखान्यात औषध उपचार करून ऍडमिट होणे परवडणारे नसल्याने त्यांनी पुन्हा मढेवडगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केलेत. आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे मुलीला डोळा गमावण्याची नामुष्की ओढवली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!