भाईंचे शिवसैनिकांना स्वबळाचे इंजेक्शन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व दुकानदारांकडून प्लॅस्टिक बंदीबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे. यानंतर प्लॅस्टिक सापडले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असल्याचे ढोल शिवसेनेचे मंत्री रामदास कदम नगरमध्ये वाजवला.

माऊली सभागृहात वक्ता शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी कदम बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, खा. सदाशिव लोखंडे, आ. विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, गणेश कवडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

कदम म्हणाले की, प्लॅस्टिक बंदीबाबत सरकार प्रतित्रापत्राबाबत नोटीफिकेशन काढणार आहे. गुजरातमध्ये प्लॅस्टिक तयार करणारे कारखाने सुरू आहेत. त्याची माहिती गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर गुजरातमधील प्लॅस्टिक राज्यात आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शिवसेनेत नारायण राणे वक्तृत्वाने मोठे झाले.त्यांची राजकारणात उंची वाढली. राणे हे कोकणाला लागलेला डाग आहे. असे सांगत शिवसेना सोडलेलेल्यांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, दुपारच्या सत्रात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

चौकट
लोकसभा व विधानसभाबाबत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर कदम यांनी शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची स्वतंत्र बैठक घेतली.

LEAVE A REPLY

*