शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर

0
आ. संग्राम जगताप ‘त्या’ कृत्याची केली चिरफाड
अहमदनगर(प्रतिनिधी) – विरोधकांनी 25 वर्षांत शासनाकडे कोणत्याच विकासासाठी पाठपुरावा केला नाही. स्वतःच्या राजकारणासाठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून नगरची बदनामी करण्याचेच काम केले. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या ‘त्या’ कृत्याची चिरफाड केली. 
त्या वाईट घटनेतून आम्ही पोळून निघालो आहे. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी होणे गरजेचे आहे. आता निवडणुका जवळ आल्या की जातीयवादावर चर्चा सुरू होईल. कोणीही विकासकामावर बोलणार नाही. परंतु आम्ही विकासकामावर बोलायला सुरुवात केली व कृतीही सुरू केली आहे. कुमारसिंह वाकळे यांनी पहिल्याच 5 वर्षांमध्ये नागरिकांना विकास काय असतो हे कामाच्या माध्यमातून दाखवून दिले असल्याचे सांगत जगताप यांनी वाकळेंचे कौतूक केले.
कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून व आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सावेडी गाव ते बोल्हेगाव, गांधीनगर, निंबळक रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आ. अरुण जगताप, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, बबन वाकळे, नाथाजी वाटमोडे, आसाराम कातोरे, ज्ञानदेव कापडे, भाऊसाहेब भोर, बाळासाहेब वाकळे, सुभाष बारस्कर, बालासाहेब कराळे, किसन कोलते, विष्णू भोर, रजनी अमोदकर, जिवडे, अण्णा इथापे, अ‍ॅड. राजेश कातोरे, बाळू वाकळे, रमेश वाकळे, राजेश वाकळे, राम कदम, दत्तू वाकळे, दादा दरेकर, सागर सप्रे, सिद्धार्थ आव्हाड, महेश बुचूडे, रमेश कळमकर, अरुण ससे, पोपट बारस्कर, सुरेश बनसोडे, किरण कातोरे, पंकज वाकळे, भाऊसाहेब वाकळे, बाली बांगरे आदी उपस्थित होते.
दादा कळमकर म्हणाले की, विरोधकांना सत्तेच्या माध्यमातून कधीही नगर शहरासाठी एक दमडीही विकासकामासाठी आणता आला नाही. आ. संग्राम जगताप यांनी उपनगरातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लावली. या सुमारे 1.5 कोटी रुपये खर्चून होणार्‍या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिक नगर शहरात अवघ्या 5 मिनिटांत येतील. सत्ताधारी लोक भूलथापा मारण्यात पटाईत आहेत. पंतप्रधान मोदींनी लोकांना एवढे बनवले आहे. अच्छे दिन नाही तर आता बुरे दिन आले आहेत. एक तरी चांगले काम सांगावे. आता पुढील होणारी सभा या ठिकाणी विजयाची सभा घेण्यासाठी आम्ही येणार आहे, असे सांगितले.आ. अरुण जगताप म्हणाले की, मनपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार यात शंका नाही. एक हाती सत्ता आल्यावर शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. शहरात समावेश असला तरी हा परिसर ग्रामीणलगत आहे. त्याला शहरीकरणाचे रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेने सेवा करणार्‍यांनाच संधी द्यावी. या भागाशी दादा कळमकर व माझे जुने संबंध आहेत. या भागातील जनता ही प्रामाणिकपणे काम करणार्‍याच्या पाठीमागे उभी राहते याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
कुमार वाकळे म्हणाले , गेल्या 5 वर्षांमध्ये अहमदनगर मनपा व आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभागाचा विकासकामातून कायापालट केला आहे. विरोधकांकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नसल्यामुळे ते आता ‘हा आमच्या गावचा व तो त्या गावचा’ अशी अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी प्रभागात किती विकासकामे केली हे आधी जनतेला सांगावे, माझ्याइतकी विकासकामे केली असेल, तर मी ही निवडणूक लढवणार नाही असे आव्हान वाकळे यांनी दिले.
……
————————
कुमार वाकळे यांच्या प्रयत्नातून व आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सावेडी गाव ते बोल्हेगाव, गांधीनगर, निंबळक दरम्यानच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी आ. दादा कळमकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आ. अरुण जगताप, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, बबन वाकळे, नाथाजी वाटमोडे, आसाराम कातोरे, ज्ञानदेव कापडे, भाऊसाहेब भोर, बाळासाहेब वाकळे, सुभाष बारस्कर, बालासाहेब कराळे, किसन कोलते, विष्णू भोर, रजनी अमोदकर, जिवडे, अण्णा इथापे, अ‍ॅड. राजेश कातोरे, बाळू वाकळे, रमेश वाकळे, राजेश वाकळे, राम कदम, दत्तू वाकळे, दादा दरेकर, सागर सप्रे, सिद्धार्थ आव्हाड, महेश बुचूडे, रमेश कळमकर, अरुण ससे, पोपट बारस्कर, सुरेश बनसोडे, किरण कातोरे, पंकज वाकळे, भाऊसाहेब वाकळे, बाली बांगरे आदी.

बोल्हेगाव आई, नागापूर मावशी
बोल्हेगाव ही माझी आई व नागापूर मावशी. पुढील काळात नागपूरच्या विकासाला चालना देणार आहे. 10 वर्षे नगरसेवक असणार्‍यांनी काय दिवे लावले. गांधीनगरचा नगरसेवक नसलो तरी मीच त्या भागाचा विकास करणार. गांधीनगरचे व माझे घरातील नाते आहे. या भागातील राहणारे लोक हे गरीब आहेत. परंतु प्रेम करणारे आहेत. यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. या भागातील चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे होणार असल्याचा दावा वाकळे यांनी केला.

LEAVE A REPLY

*