अहमदनगर : सेनेच्या ‘वाड्याला’ भिंगारमध्ये सुरूंग

0

निवडणुकीसाठी पेरणी, वीस जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा भिंगारच्या गवळीवाड्यालाच राष्ट्रवादीने सुरूंग लावला आहे. भिंगार येथे तीन शाखांचे उद्घाटन आणि वीस कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सायंकळी होत आहे.
आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत भिंगारने सेनेला नेहमीच मताधिक्य दिले आहे. संग्राम जगताप आमदार झाल्यानंतर त्यांनी आपले सारे लक्ष भिंगारवर केंद्रीत केले आहे. विश्‍वासू असलेले राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांच्यावर त्यांनी भिंगारची जबाबदारी टाकली आहे. खोसे यांनी या जबाबदारीला पात्र राहून राज्यातील पहिलीच छावणी परिषदेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकाविला.
खोसे यांनी भिंगार येथे गवळीवाड्यात सभा घेऊन सेनेला सुरूंग लावला आहे. संजय खताडे यांना भिंगार विभागाचे अध्यक्ष करून राष्ट्रवादीने आतापासूनच विधानसभेसाठी पेरणी सुरू केली आहे. नेहरू कॉलनी येथे मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या शाखाचे उद्घाटन केले जाणार आहे.
भिंगार, हातमपूरा व बोल्हेगावच्या गणेश चौकात धनंजय मुंडे यांच्या सभा होणार आहेत. शहरातील हातमपुरा, दिल्लीगेट, बालिकाश्रम रस्ता, भिंगार, सावेडी अशा विविध ठिकाणी मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या शाखांचे उद्घाटन केले जाणार आहे.

सेना, भाजप, मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश –
मुंडे यांच्या उपस्थितीत शहर व भिंगारमधील सेना, भाजप, मनसे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सेनेचे सावेडी उपशहरप्रमुख किरण पिसोरे यांचा मुंडे यांच्या हस्ते सन्मान करून प्रवेश सोहळा होत आहे. भिंगारमधील भाजपच्या मिनाताई मोरे, सेनेच्या अर्चना परदेशी, दिनेश रणदिवे, मनसेच्या अरुणा बोरा, संदीप ऊर्फ गीताराम काळे व काँग्रेसचे सागर चाबुकस्वार यांच्यासह वीस जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. 

LEAVE A REPLY

*