Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

साईदरबारी लोकसभेची तयारी

Share

शिर्डी (प्रतिनिधी) – आधीच्या सरकारने 25 लाख घर बांधण्यासाठी 4 वर्ष लावली, भाजप सरकारने मात्र सव्वा कोटी घरं बांधली. शिवाय घरबांधणीसाठी देण्यात येणारा निधीही वाढविला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढविला. शिर्डीत साईदरबारी आज सकाळी मोदी यांनी मिशन 2019 चा नारळ फोडला.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज शिर्डीत राज्यातील 29 जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलांचं ई-वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मोदींनी सरकारकडून 4 वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या कामांची तुलनादेखील केली. आधीचं सरकार घरासाठी 70 हजार रुपये द्यायचे, आम्ही घरासाठी 1 लाख रुपये देतो. याशिवाय भाजपा सरकारनं दिलेल्या घरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आम्ही गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरं उभारली. मागील सरकारच्या कामाचा वेग पाहता इथंपर्यंत पोहोचायला त्यांना आणखी 20 वर्ष लागली असती, अशी आकडेवारी सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नगरला 50 कोटी
प्रस्तावित उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी 50 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या साक्षीने फडणवीस यांनी शिर्डीत हा शब्द दिल्याने नगरचा उड्डाणपुल आता होणार ही नगरकरांची आशा पल्लवीत झाली. नगरच्या उड्डापुलाकरीता केंद्र शासनाने निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याकरीता महापालिकेला 50 कोटी रुपयांचा हिस्सा भरावा लागणार होता. मात्र तो हिस्सा आता राज्य शासन भरणार आहे. खा. दिलीप गांधी यांचा नामोल्लेख करून फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरकरांना दिवाळी गिफ्ट दिले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!