Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

शेवगावतील महावितरणच्या वायरमनचा मनमानी कारभाराने नागरिक हैराण

Share

तक्रार करून देखील महावितरण अधिकाऱ्यांचे मौन
शेवगाव : तालुक्यातील शहरटाकळी येथील वायरमनच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा त्रास अनावर झाल्याने शहरटाकळी ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीची मागणी शेवगाव वीजवितरण कंपनीचे उपअभियंता शंकर चिंचाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बदली न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर बाजार समितीचे सभापती अॅड. अनिल मडके, सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिलीप राजळे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खंडागळे, सुनील गवळी, वाय डी कोल्हे, उत्तम गवळी, भाऊसाहेब मडके आदींसह ग्रामस्थाच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे कि, शहरटाकळी सबस्टेशन अंतर्गत येथे कार्यरत असलेले वायरमन यांचा मनमानी कारभार चालू आहे. कायम शेतकऱ्यांना व नागरिकांना अरेरावीची भाषा करणे, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी तसेच विज ग्राहकांनी लाईट बाबत काही विचारपूस केली तर धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला याबद्दल 353 दाखल केला जाईल अशी धमकी महावितरणचे कर्मचारी देत आहे.

याबाबत नागरिकांनी ग्रामसभेत महावितरण कंपनीला कारभारात सुधारणा करण्यासाठी ठराव देखील दिलेले आहेत. असे असले तरी अधिकारी देखील केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दरम्यान सदर वायरमनची तात्काळ बदली न केल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!