कचऱ्याच्या धुरामुळे वस्तीगृहातील विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात

0

शेवगाव : शहरातील जमा होणार घणकचरा शहरालगत असलेल्या आनंद निवास येथील मुलींच्या वसतीगृहाशेजारी टाकून तो पेटवून दिला जातो. या घाणीमुळे व धुरामुळे विदयार्थिनिंना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. येथील हा कचरा दुसरीकडे टाकावा अशी मागणी या वसतीगृहातील मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, शेवगाव नगरपरीषदेच्या वतीने गावातील सुका व ओला कचरा गेवराई रस्त्यावरील आनंद निवास शेवगाव येथील मुलींच्या वसतीगृहाशेजारी टाकण्यात येतो. या वस्तीगृहात ५५ मुली व आरोग्य सेविका राहतात. या कच-यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

येथील कचरा अनेकवेळा पेटवून देण्यात येतो. या धुरामुळे वसतीगृहातील मुलींना श्वासोश्वासाचे आजार उदभवत असल्याने मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान हि समस्यां तातडीने सोडवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

*