अहमदनगर : वोडाफोन थिएटर अॅकॅडमीतर्फे शनिवारी संगीत एकांकिकेविषयी चर्चासत्र

0

अहमदनगर : संगीत एकांकिकांचे नवीन विषय घेऊन वोडाफोन थिएटर अॅकॅडमीने संगीत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार आहे . २०‍१७ हे या स्पर्धेचे आठवे वर्ष आहे.

दरवर्षी प्रमाणे संगीत एकांकिकेविषयी चर्चासत्र आयोजित केले आहे. संगीत एकांकिका कशाला म्हणावे ? नक्की कोणता संगीत वापरता येतं? लिखाणाची नक्की प्रक्रिया काय ? शास्त्रीय संगीता खेरीज संगीत एकांकिका सादर करता येते का ? अशा अनेक प्रश्नांशी निगडीत हे चर्चासत्र रत्नागिरी, कणकवली, नाशिक आणि अहमदनगर येथे होत आहे.

अहमदनगर येथे शनिवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सायं  ७ वाजता रानडे हॉल, कोर्ट गल्ली, दोबोटी चिरा येथे आयोजित केले आहे.

एकांकिका लेखन, दिग्दर्शन, संगीत या मागचा विचार करण्यासाठी नवोदित लेखक, संगीतकार तसेच संस्थेचे पदाधिकारी यांचे संचालन करणार आहेत. या चर्चासत्रासाठी लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार यांना सहभागी होता येणार आहे.

यापूर्वी लेखन, दिग्दर्शन, संगीत या क्षेत्रात काम केलेल्या कलाकारांनाच यामध्ये सहभागी होता येणार आहे.

चर्चासत्रात निःशुल्क पण मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*