दूधसागरमधील ‘आदर्श’पाठ; स्लॅबच्या छताला गळती

0

शाळेत ना वीज ना पाणी

इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग: 06

पटसंख्या : 31

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगांव उपनगरातील आदर्शनगरच्या दुधसागर सागर सोसायटी जवळ असणार्‍या महापालिकेच्या शाळेला गळती लागली आहे. शाळेच्या धोकादायक असलेल्या इमारतीत विद्यार्थी ज्ञान संपादन करत आहेत. शाळेचे वीज जोड तोडण्यात आला असून पाणीजोडही नसल्याचे शिक्षण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.

केडगांव उपनगरात महापालिकेच्या तीन शाळा आहेत. त्यातील दुध सागर सोसायटीतील शाळेत एकूण 8 खोल्या आहेत. या खोल्यांच्या बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत निधी दिला गेला. शाळेसमोर मोठे मैदान आहे. समोर पडवी त्याला लोखंडी गेट अशी शाळा बाहेरून दिसते. तेथेच शाळेचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. शाळेच्या शेजारी मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आहे, मात्र त्याच्या छातला मोठी गळती लागण्याचे दिसून येते. मुलांना खेळण्यासाठी पटांगण असले तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. शाळेभोवती असणारी सरंक्षक भिंत सुस्थितीत असली तरी प्रवेशव्दार मोडकळीस आलेले आहे.
शाळा भव्य दिसत असली तरी छातावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी भिंतीच्या माध्यमातून वर्गात गळत आहे. त्यामुळे पाणी भिंतीला लागल्या मुळे शाळा धोकादायक बनत चालली आहे. शाळेमध्ये अनेक दिवसापासून वीज उपलब्ध नाही. शाळेच्या छताचे योग्य बांधकाम केले नसल्यामुळे शाळच्या सर्व छताला मोठी गळती लागली आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देखील अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. मुलांना खेळण्यासाठी लगणारे साहित्यही पुरेशे नाहीत. शाळेच्या छताला मोठी गळती लागल्याने शाळा धोकादायक शाळेच्या रांगेत उभी ठाकली आहे. शाळेतील शिक्षकांनी शिक्षण विभागाला दुरूस्तीसाठी पत्रव्यवहार केला, मात्र महापालिकेला शाळा दुरूस्तीकडे लक्ष द्यायला अजूनतरी वेळ मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

*