विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेत सादर करा – जिल्हाधिकारी

0

जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे महाविद्यालयांना निर्देश

अहमदनगर – जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन तात्काळ सादर करावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळेल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात द्विवेदी यांनी समाजकल्याण विभाग आणि तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय आणि जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह शिष्यवृत्ती अर्जांसंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यासाठी महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज दाखल करुन घ्यावेत आणि तपासून पात्र अर्ज तात्काळ प्राचार्यांमार्फत समाजकल्याण विभागाकडे सादर करावेत. जसजसे विद्यार्थ्यांचे अर्ज येतील त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करा.

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयांच्या पातळीवर अर्जांची प्रलंबितता ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळावी, यासाठी महाविद्यालयांनी यासंदर्भातील कार्यवाही वेळेवर करावी. तांत्रिक बाबींची अडचण येत असेल तर उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित वरिष्ठांशी पाठपुरावा करुन तसेच अभ्यासक्रमासंदर्भातील विषय असेल तर विद्यापीठाशी पाठपुरावा करुन तो विषय मार्गी लावावा, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*