Video : अहमदनगर शहरातील कोठला परिसरात मोहरम सवाऱ्यास सुरुवात

0

अहमदनगर : शहरातील कोठला परिसरात मोहरम सवाऱ्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोहरमनिमित्त गुरुवारी काढलेल्या कत्तलची रात्र मिरवणुकीपाठोपाठ आज मुख्य विसर्जन मिरवणूकही मोठ्या थाटात निघाली आहे. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. ट्रस्टी, उत्सव समिती आणि पोलिस या सर्वांनी उत्साहात सहभागी होऊन आनंद द्विगुणित केल्याचे दिसून येत आहे. पूर्वी या मिरवणुकीत ‘डीजे’चा आग्रह धरला जात असे, यंदा डीजेमुक्त मिरवणूक निघाली.

ठीक ठिकाणी तासभर सवारी खेळविण्यात येत आहे. या सवारीवर ठिकठिकाणी फुलांची चादर चढविण्यात येत आहे. मोरचंदही नाचविण्यात येत आहे. प्रथेप्रमाणे ठिकठिकाणी सवाऱ्यांवर पाणी टाकण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*