Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

सावेडी, केडगावातील सोरट अड्‌ड्यावर रेड

Share

भिंगारच्या मटक्यावरही छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी आणि केडगावात सुरू असलेल्या सोरट जुगार अड्डयावर पोलिसांनी रात्री छापे टाकले. भिंगारच्या मटका अड्‌डयावरही छापा टाकून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. सावेडीतील रेडमध्ये गोरख शिंदे (वैदुवाडी), महेंद्र राजेंद्र राऊत (गणेश चौक), नितीन बाबाजी शिंदे (वैदुवाडी), बाळू रामदास शिंदे (पाईपलाईन रोड), अनंत दिलीप शिंदे (टिव्ही सेंटर) यांना अटक करण्यात आली आहे. केडगावातील रेडमध्ये नितीन नामदेव येवले (वैष्णवीनगर), राजेंद्र तात्याभाऊ कोतकर (केडगाव),मोहसीन अफजल पठाण (एकनाथनगर), संतोष शिवाजी कोतकर (केडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगारच्या मटका रेडमध्ये साजीश मकबुल हुसेन (सदरबाजार), मोहम्मद अब्दुल रहेमान (शुक्रवार बाजार), राहुल बाबुराव भिंगारदिवे (आंबेडकर कॉलनी), इम्रान अकिल शेख (सदरबाजार), अल्लारखा कासम शेख (आशा टॉकिज चौक), इसाक अजीज शेख (बुर्‍हाणनगर), अकिल रफिक शेख  (बुकी,सदरबाजार) यांच्याविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीतील भिस्तबाग चौकाजवळ गायकवाड चिकन दुकानाच्या पाठीमागे आणि केडगावातील अंबिका हॉटेलच्या मागे व पुढे अशा तीन ठिकाणी सोरट जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एसपी रंजनकुमार शर्मा, एएसपी जयंत मीना, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग सुपेकर, हेमंत खंडागळे, महेश मगर, अभिजीत अरकल, सागर द्वारके यांच्या पथकाने रेड टाकून आरोपी अटक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!