टाकळी ढोकेश्‍वरमध्ये तरुणाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

0

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वासुंदे येथील रहिवासी असलेल्या व देवकृपा पतसंस्थेचे कर्मचारी पंढरीनाथ किसन झावरे (वय 35) यांचे स्वाईनफ्लूने निधन झाले. ते 35 वर्षांचे होते. वासुंदे येथील पंढरीनाथ किसन झावरे यांना चार ते पाच दिवसांपासून तापाची कणकण निर्माण झाली होती.

 

त्यामुळे त्याने टाकळी ढोकेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे रक्ताची तपासणी करण्यात आली असता स्वाईनफ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

 
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने महिला त्रस्त असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर परिसरात स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने अनेकजण त्रस्त झालेले आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंढरीनाथ झावरे यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती. पंचक्रोशीतील बैलगाडा शर्यतींना ते नेहमीच हजेरी लावत होते. त्यामुळे बैलगाडा संघटनेेत त्यांची चांगली ओळख होती. त्यांचा मृत्यू झाल्याने बैलगाडा संघटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरीनाथ झावरे यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*