लिंपणगावच्या सरपंचा विरोधात अविश्वास ठरावावर उद्या गुरुवारी मतदान

0

ग्रामपंचायत सदस्य अज्ञात स्थळी सहलीला रवाना

लिंपणगाव (वार्ताहार) : श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी साळवे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठरावावर गुरुवारी (दि.14) रोजी मतदानम होणार आहे. सकाळी 11 वाजता तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आले आहे.

तहसीलदारांनी ग्रामपंचायतच्या सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान;सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार
सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर करण्यासाठी 13 सदस्य अज्ञात स्थळी सहलीला रवाना झाली आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

LEAVE A REPLY

*